भजनी मालिका
← भजनांकडे परत

नोहे सायास रामनामीं । संसारासी गुंते प्राणी

nohe sayas ramanamin | sansarasi gunte prani

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नोहे सायास रामनामीं । संसारासी गुंते प्राणी ॥१॥ आठवी वाचे म्हणे रामनाम । संसार नुरेची श्रम ॥२॥ नका करूं वायां श्रम । वाचे म्हणे रामनाम ॥३॥ आवडीनें नाम घोका । म्हणे जनार्दनाचा एका ॥४॥