भजनी मालिका

भजने

पंढरि पुण्यभूमी भीमा दक्षिणावाहिनी । तीर्थ हें चंद्रभागा महा पातकां धुनी । उतरलें वैकुंठमहासुख मेदिनी ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

पंढरिचा देव बहुत कोंवळा । सगुण सांवळा सारथि हा ॥१॥ सारथि सर्वांच्या साक्षिभूत असे । संकटीं सायासें गजेंद्रासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पढंरिची वारी करील जो कोणी । त्याच्या चक्रपाणी मागें पुढें ॥१॥ लोखंड असतां सोनें झालें कैसें । सभागम मिषें गुणें त्याच्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरिचे अनुष्ठान केलें चंद्रे । अलंकापुरी इंद्रें तपचर्या ॥१॥ तेथें इंदु निष्कलंक अंगें । तेथें आरोग्यभगें सुरेंद्रता ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पंढरी ज्ञानिया ध्यातां लक्षा नये । आह्मां वाट पहे अनाथांची ॥१॥ जपकांचें जाप्य नानामंत्रमय । आम्हां भक्ति प्रिय भावें सारी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरी नगरी दैवत श्रीहरी । जाती वारकरी व्रतनेमें ॥ १ ॥ आषाढी कार्तिकी महापर्वें थोर । भजनाचा गजर करिती तेथें ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

पंढरी नगरीं नांदतो श्रीहरी । गाई वळित्या करी गोपाळपुरीं ॥ १ ॥ गोपाळ मिळाले गोपाळपुर झालें । अक्षयीं राहिले देव तेथें ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

पंढरी सांडोनी जाती वाराणसी । काय सुख त्यांसी आहे तेथें ॥१॥ तया पंचक्रोसी म्हणती मरावें । मरोनियां व्हावें जीवन्मुक्त ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरी सांडोनी जाती वाराणसी काय सुख त्यांसी आहे तेथें ॥ १॥ तया पंचक्रोसी म्हणती मरावें। मरोनियां व्हावें जीवन्मुक्त ॥ २ ॥

रचनाकार: संत जनाबाई

पंढरी हें क्षेत्र पावन पवित्र । महिमा विचित्र त्रिभुवनीं ॥१॥ पाहिलिया क्षणीं नासती पातकें । ऐसियासी तुके दुजें कोण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरीचा देव तत्सच्चित अद्वय । तूंचि बापमाय पांडु-रंगा ॥१॥ सगुण निर्गुण दाविसी प्रकर । दाही अवतार निमि-तासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरीचा देव पाहतां सगुण । प्रर्‍हादाकारणें सिद्ध झाला ॥१॥ पंढरीचा देव पतित पावन । उभा नारायण विटेवरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरीचा पोहा आला आळंकापुरीं । पंच कोसावरी साधुजन ॥१॥ पांडुरंगा संगें वैष्णवांचे भार । दिंड्या ते बाहेर निघाल्यस ॥२॥

रचनाकार: संत नामदेव