भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरी सांडोनी जाती वाराणसी काय सुख त्यांसी आहे तेथें

pandhari sandoni jati varanasi kay sukh tyansi ahe tethen

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
पंढरी सांडोनी जाती वाराणसी काय सुख त्यांसी आहे तेथें ॥ १॥ तया पंचक्रोसी म्हणती मरावें। मरोनियां व्हावें जीवन्मुक्त ॥ २ ॥ नको गा विठोबा मज धाडूं काशी सांगेन तुजपाशीं ऐक आतां ॥३॥ मरचीमात्र वेरण स्तंभीं घाली घालोनियां गाळीं पापपुण्य ॥४॥ जावोनियां तेथें प्रहर दोन रात्रीं । सत्य मिथ्या श्रोतीं श्रवण करा ॥५॥ आई आई बाबा म्हणती काय करूं। ऐसें दुःख थोरू आहे तेथें ॥६॥ इक्षुदंड घाणा जैसा भरी माळी। तैसा तो कवळी काळनाथ॥७॥ लिंगदेहादिक करिती कंदन तेथील यातना नको देवा ॥८॥ न जाय तो जीव एकसरी हरी रडती नानापरी नानादु:खें ॥९॥ अमरादिक थोर थोर भांबावले। भुलोनियां गेले मुक्तीसाठीं ॥१०॥ ती ही मुक्ति माझी खेळे पंढरीसी । लागतां पायांसी संतांचिया ॥११॥ ऐसिये पंढरी पहाती शिखरी आणि भीमातीरी मोक्ष आला॥१२॥ सख्या पुंडलिका लागतांचि पाया। मुक्ति म्हणे वांयां गेलें मी कीं ॥१३॥ पर रिपवणी मुक्ति होय दासी मोक्ष तो पाठीसी धांव घाली ॥१४॥ मोक्ष सुखासाठी मुक्ति लोळे। वीं नेपे कोणी कदा काळीं ॥१५॥ मोक्ष मुक्ति जिहीं हाणितल्या पायीं। आमुची ती काय धरिती सोयी ॥ १६ ॥ समर्थाचे घरी मिक्षा नानापरी मागल्या पदरी पालिताती ॥१७॥ अंबोल्या सांडोनी कोण मागे भीक। सामराज्याचें सुख तुझें ॥ १८॥ जनी म्हणे तुज रखुमाईची आण जरी मज क्षण विसंबसी ॥ १९॥