भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरपुरींचा निळा लावण्याचा पुतळा

pandharapurincha nila lavanyacha putala

पंढरपुरींचा निळा लावण्याचा पुतळा । विठो देखियेला डोळां बाईयेवो ॥१॥ वेधलें वो मन तयाचियां गुणीं । क्षणभर विठ्ठलरुक्मिणी न विसंबे ॥२॥ पौर्णिमेचें चांदिणे क्षणक्षणा होय उणें । तैसें माझे जिणें एक विठ्ठलेंविण ॥३॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलचि पुरे । चित्त चैतन्य मुरे बाईये वो ॥४॥