भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरिचे अनुष्ठान केलें चंद्रे । अलंकापुरी इंद्रें तपचर्या

pandhariche anushthan kelen chandre | alankapuri indren tapacharya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पंढरिचे अनुष्ठान केलें चंद्रे । अलंकापुरी इंद्रें तपचर्या ॥१॥ तेथें इंदु निष्कलंक अंगें । तेथें आरोग्यभगें सुरेंद्रता ॥२॥ हरिहररुपें पंढरीरावो । येथें तिन्ही देवो सिध्दरुपें ॥३॥ निळा म्हणे तेथें भक्ती । येथें विरक्ती प्रगटली ॥४॥