भजनी मालिका

भजने

पंढरीस दुःख न मिळे ओखदा । प्रेमसुख सदा सर्वकाळ ॥१॥ पुंडलिकें हाट भरियेली पेंठ । अवघें वैकुंठ आणियेलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पंढरीसी जा रे आल्यानो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ॥१॥ वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळूं तांतडी उतावीळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पंढरीसी जावें ऐसें माझें मनीं । विठाई जननी भेटे केव्हां ॥१॥ न लगे त्याविण सुखाचा सोहळा । लागे मज ज्वाळा अग्निचिया ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

पंढरीसी यात्रा मिळाली अपार । नाहीं तो सुंदर पांडुरंग ॥१॥ म्हणती संतजन काय झाला देव । पडलासे संदेह सकळांसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पढियंतें आम्ही तुजपाशीं मागावें । जीवींचें सांगावें हितगुज ॥१॥ पाळसील लळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे जननिये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पढीयंतें मागा पांडुरंगापाशीं । मज दुर्बळासी काय पीडा ॥१॥ या चि साठी दुराविला संवसार । वाढे हे अपार माया तृष्णा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पतना न्यावें जिहीं दोषीं । कीर्तनीं तयांसी हा रस ॥१॥ जैसें बीज भाजल्याअंतीं । नुगवेचि शेतीं पेरिल्य ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पतनाच्या भया नोळखे पामर । करी वेरझार नानापरी ॥१॥ नायके कीर्तन न पाहे पंढरी । वैष्णवाचे दारीं न जाये मूढ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पताकांचे भार वैष्णव नाचती । रामकृष्ण गाती नामावळी ॥१॥ शालीवाहन शके पंधराशे अकरा । विजय संवत्सरा फाल्गुन मास ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पतित पातकी खळ दुराचारी । पाहतां पंढरी मोक्ष तयां ॥१॥ स्वमुखं भक्तां सांगतों आपण । नका अनुमान धरुं कोणी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ