भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीसी जा रे आल्यानो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग

pandharisi ja re alyano sansara | dinacha soyara pandurang

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पंढरीसी जा रे आल्यानो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ॥१॥ वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळूं तांतडी उतावीळ ॥ध्रु.॥ मागील परिहार पुढें नाही शीण । जालिया दर्षणें एकवेळा ॥२॥ तुका म्हणे नेदी आणिकांचे हातीं । बैसला तोचित्तीं निवडेना ॥३॥