भजनी मालिका
← भजनांकडे परत

पताकांचे भार वैष्णव नाचती । रामकृष्ण गाती नामावळी

patakanche bhar vaishnav nachati | ramakrushna gati namavali

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पताकांचे भार वैष्णव नाचती । रामकृष्ण गाती नामावळी ॥१॥ शालीवाहन शके पंधराशे अकरा । विजय संवत्सरा फाल्गुन मास ॥२॥ उत्तम हे तिथी षष्टी रविवार । प्रयाण्‍ साचार दोन प्रहरीं ॥३॥ निळा म्हणे ऐशा नामाच्या गजरीं । समाधि गोजिरी प्रतिष्ठानी ॥४॥