भजनी मालिका
← भजनांकडे परत

पढंरिची वारी करील जो कोणी । त्याच्या चक्रपाणी मागें पुढें

padhanrichi vari karil jo koni | tyachya chakrapani magen pudhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पढंरिची वारी करील जो कोणी । त्याच्या चक्रपाणी मागें पुढें ॥१॥ लोखंड असतां सोनें झालें कैसें । सभागम मिषें गुणें त्याच्या ॥२॥ तैसेम एक वेळ करीं मायबापा । चुकवीं या खेपा चौर्‍यांशींच्या ॥३॥ नामा ह्मणे असो प्रारब्ध सरे । होई कृपण नीकुरे चरणाचे ॥४॥