भजनी मालिका
← भजनांकडे परत

पक्षी जाय दिगंतरा बाळकांसी आणी चारा

pakshi jay digantara balakansi ani chara

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
पक्षी जाय दिगंतरा बाळकांसी आणी चारा ।।१।। घार हिंडते आकाशीं झांप घाली पिल्लांपासी ॥२॥ माता गुंतली कामासी। चित्त तिचें बाळापाशीं ॥३॥ वानर हिंडे झाडावरी। पिली बांधुनी उदरीं ॥४॥ तैसी आम्हांसी विठ्ठल माये। जनी वेळोवेळां पाहे॥५॥