भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणते तयासी नेणता लहान । थोरा थोरपणें दिसे बरा

nenate tayasi nenata lahan | thora thorapanen dise bara

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
नेणते तयासी नेणता लहान । थोरा थोरपणें दिसे बरा ॥१॥ पावा वाहे वेणु खांदिया कांबळा । रूळताती गळां गुंजहार ॥२॥ मुखीं दहींभात कवळ काल्याचें । उष्टें गोपाळांचे खाय सुखें ॥३॥ चोखा म्हणे ऐसा वैकुंठींचा हरी । गोपाळा गजरीं काला वांटी ॥४॥