भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्गुणपणाच्या घेसी अभिमाना । तुन नारायणा शोधीं नामीं

nirgunapanachya ghesi abhimana | tun narayana shodhin namin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निर्गुणपणाच्या घेसी अभिमाना । तुन नारायणा शोधीं नामीं ॥१॥ काय तुझी भीड धरावी म्यां आतां । कृपाळु अनंता म्हणें ना मी ॥२॥ पुंढलिकासाठीं उभा राहिलासी । ठकडा तूं होसी म्हणे ना मी ॥३॥ नामा म्हणे नको मज चाळवण । लवकरी चरण दावींना का ॥४॥