भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्गुणाची वार्ता सगुणीं मांडीली

nirgunachi varta sagunin mandili

निर्गुणाची वार्ता सगुणीं मांडीली । सगुण निर्गुण दोन्ही एकरुपा आली ॥१॥ सगुण नव्हे तें निर्गुण नव्हे । गुरुमुखें चोजवे जाणितलें बापा ॥२॥ रखुमादेविवरु साकारु निराकारु नव्हे । कांही नहोनि होये तो बाईये वो ॥३॥