भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्गुण सगुण श्रुतीसी वेगळें । तें रुप सांवळें गोकुळीं वसे

nirgun sagun shrutisi vegalen | ten rup sanvalen gokulin vase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
निर्गुण सगुण श्रुतीसी वेगळें । तें रुप सांवळें गोकुळीं वसे ॥१॥ डेळियांची धनी पाहतां न पुरे । तयालागीं झुरे चित्त माझें ॥२॥ वेडावलीं दरुशनें भांडती अखंड । वेदांचे तें तोंड स्तब्ध जाहलें ॥३॥ एका जनार्दनीं सांवळें सगुण । खेळतसे जाण वृदांवनीं ॥४॥