भजनी मालिका

भजने

डाई घालुनियां पोरें । त्यांचीं गुरें चुकवीलीं ॥१॥ खेळ खेळतां फोडिल्या डोया । आपण होय निराळा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

डोईचा पदर आला खांद्यावरी । भरल्या बाजारीं जाईन मी ॥१॥ हातीं घेईन टाळ खांद्यावरी वीणा । आतां मज मना कोण करी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी ॥ १॥ हातीं घेईन टाळ खांद्यावरी वीणा । आतां मज मना कोण करी ।।२।।

रचनाकार: संत जनाबाई

डोलत डोलत टकमक चाले । गोजिरीं पाउलें टाकू-नियां ॥१॥ पायीं रुणझुण वाजताती वाळे । गोपी पाहतां डोळे मन निवे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

डोळा फोडोनियां काजळ ल्याला । नाम कापून शिमगा खेळला ॥१॥ वेंचिती धन लक्ष कोटी । आयुष्य क्षणचि नोहे भेटी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

डोळियां पाझर कंठ माझा दाटे । येऊं देई भेटे पांडुरंगे ॥१॥ बहु दिस टाकिले निरास कां केलें । कोठें वो गुंतलें चित्त तुझें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

डोळियाचा देंखणा पाहतांच दिठी । डोळाच निघाला देखण्या पोटी ॥१॥ डोळ्याचा देखणा पाहिला डोळा । आपेआप तेथें झांकला डोळा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

डोळियाचाही डोळा बुध्दी । माझी उघडूनियां कृपानिधी । देखणी करुनियां त्रिशुध्द । निजात्मपदीं स्थापिली ॥१॥ तेणें दिसती ठायां ठावो । हदय सकळांचेही भाव । संत दावी जे अनुभव । आणखीही सर्व मायाकृत ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

डोळियाची भुक हारपली । पाहतां श्रीविठ्ठल माउली ॥१॥ पुंडलिकें बरवें केलें । परब्रह्मा उभें ठेलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

डोळियांनें रूप पहावें साचार । मुखानें उच्चार रामनाम ॥१॥ हृदयीं आठव नाम तें वसावें । करें पैं अर्पावे संतचरण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

डोळुले सिणले पाहता वाटुली । अवस्था दाटली ह्रदयामाजीं ॥१॥ तूं माझी जननी सखिये सांगातिणी । विठ्ठले धांवोनी देई क्षेम ॥२॥

रचनाकार: संत नामदेव