भजनी मालिका

भजने

डोहामाजीं वास होता बहुत दिवस । आतां कासा-वीस काय सांगूं ॥१॥ विक्राळ होऊनि आला चक्रपानी । काळिया निर्वाणीं ध्यान करी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ढालतलवारे गुंतले हे कर । म्हणे मी झुंजार कैसा जुंझो ॥१॥ पोटी पडदळ सिले टोप ओझें । हें तों जालें दुजें मरणमूळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ढेंकणाचे संगें हिरा जो भंगला । कुसंगें नाडला तैसा साधु ॥१॥ ओढाळाच्या संगें सात्विक नासलीं । क्षण एक नाडलीं समागमें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ढेंकरें जेवण दिसे साचें । नाहीं तरि काचें कुंथाकुंथी ॥१॥ हे ही बोल ते ही बोल । कोरडे फोल रुचीविण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तट्टाचे जातीला नाहीं भीड भार । लाता मारी थोर लहान नेणे ॥१॥ परी तो त्या विशेष मनुष्य होऊन । करी खंड मान वडिलांचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तंतुपट जेवीं एकत्व दिसती । तैसीं भगवद्भक्ति सर्वांभुतीं ॥१॥ सर्वत्रीं व्यापक विठ्ठल विसांवा । म्हणोनी त्याच्य गांवा मन धांवे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तत्त्व पुसावया गेलों वेदज्ञासी । तंव भरले त्यापासीं विधिनिषेध ॥१॥ तया समाधान नुपजे कदा काळीं । अहंकार बळि जाला तेथेम ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तत्त्वें तत्त्व धरी कोहंभाव होकारी । सोहं सोहं करी कोण सये ॥१॥ सोकरी पुंडलिकु ज्ञान पुण्यश्लोकु । विठ्ठलु त्रैलोकु उध्दरिले ॥२॥

तत्वमसी वाक्य उपदेशिलें तुज । तें तूं जीवीं कां अझून धरिसी दुर ॥ध्रु०॥ त्रिभुवनापरता धांवतोसी दुरी । आधीं तूं आपुली शुद्धि करी । उदय अस्तु झाला कवणीये घरीं । पिंडा माझारीं पोहेपां ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

तन मन धन दिलें पंढरिराया । आतां सांगावया उरलें नाहीं ॥१॥ अर्थचाड चिंता नाहीं मनीं आशा । तोडियेला फांसा उपाधीचा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम