भजनी मालिका
← भजनांकडे परत

ढेंकणाचे संगें हिरा जो भंगला । कुसंगें नाडला तैसा साधु

dhenkanache sangen hira jo bhangala | kusangen nadala taisa sadhu

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ढेंकणाचे संगें हिरा जो भंगला । कुसंगें नाडला तैसा साधु ॥१॥ ओढाळाच्या संगें सात्विक नासलीं । क्षण एक नाडलीं समागमें ॥ध्रु.॥ डांकाचे संगती सोनें हीन जालें । मोल तें तुटलें लक्ष कोडी ॥२॥ विषानें पक्वान्नें गोड कडू जालीं । कुसंगानें केली तैसी परी ॥३॥ भावें तुका म्हणे सत्संग हा बरा । कुसंग हा फेरा चौऱ्यांशीचा ॥४॥