भजनी मालिका

भजने

तयालागीं ज्ञानी म्हणती नैमित्तिक पितृ श्राद्धादिक जाणावें तें ॥१॥ संतांचें दर्शन ज्ञानियाची भेटी । उत्थापन अटी करणें लागे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तयांसवें करी काला दहींभात । सिदोऱ्या अनंत मेळवुनी ॥१॥ मेळवुनी अवघियांचे एके ठायीं । मागें पुढें कांहीं उरों नेदी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

तयासी नेणतीं बहु आवडती । होय जयां चित्तीं एक भाव ॥१॥ उपमन्यु धुरु हें काय जाणती । प्रल्हादाच्या चित्तीं नारायण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तयेकाळीं देव गोकुळीं भरले । अगोचर रूप झाले ठायीं ठायीं ॥१॥ सकळ संपत्ति भरूनि उरल्या । दिगंतरीं गेल्या विपत्ति त्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तयेवेळीं तो ह्माळसेनू । श्रीकृष्णासी नमस्कारानू । पां-डवासी वंदनू । मग सकळिका रायांसी ॥१॥ मग रायासी स्वधर्में । तेणें आलिंगिलें अनुक्रमें । संतोषोनी राया धर्में । बैसविला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तरठ्या तरठ मारूं केला । बुडत्याचें डोई दगड दिला ॥१॥ तैसें जन्मोनियां प्राणी विषयांतें गेलें भुलोनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तरले ते मागें आपुलिया सत्ता । कमाई अनंता करूनियां ॥१॥ उसनें फेडितां धर्म तेथें कोण । ते तुज अनन्ये तुह्मी त्यांसी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तरले संगती अपार । वाल्मीकादि हा निर्धार । पापी दुराचार । अजामेळ तरला ॥१॥ ऐसा संताचा महिमा । नाहीं आनिक उपमा । अनुसरलिया प्रेमा । तरताती निःसंदेह ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तरलों म्हणऊनि धरिला ताठा । त्यासी चळ झाला फांटा ॥१॥ वांयांविण तुटे दोड । मान सुख इच्छी मांड ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तरि कां नेणते होते मागें ॠषी । तींहीं या जनासी दुराविलें ॥१॥ वोळती जया अष्टमहा सिद्धी । ते या जनबुद्धी नातळती ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

तरि कां पवाडे गर्जती पुराणें । असता नारायण शिक्तहीन ॥१॥ कीर्तीविण नाहीं नामाचा डांगोरा । येर कां इतरां वाणीत ना ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तरि च हा जीव संसारीं उदास । धरिला विश्वास तुम्हां सोई ॥१॥ एके जातीविण नाहीं कळवळा । ओढली गोपाळा सूत्रदोरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तरि म्यां आळवावे कोणा । कोण हे पुरवील वासना। तुजवांचूनि नारायणा । लावी स्तना कृपावंते ॥१॥ आपुला न विचारी सिण । न धरीं अंगसंगें भिन्न । अंगीकारिलें राखें दीन । देई जीवदान आवडीचें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम