भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरि कां पवाडे गर्जती पुराणें । असता नारायण शिक्तहीन

tari kan pavade garjati puranen | asata narayan shiktahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तरि कां पवाडे गर्जती पुराणें । असता नारायण शिक्तहीन ॥१॥ कीर्तीविण नाहीं नामाचा डांगोरा । येर कां इतरां वाणीत ना ॥ध्रु.॥ तरि च म्हणा तो आहे चिरंजीव । केलियाचा जीव सुखीं गुणे ॥२॥ चांगलेपण हें निरुपायता अंगीं । बाणलें श्रीरंगा म्हणऊनि ॥३॥ तरि च हा थोर सांगितलें करी । अभिमान हरीपाशीं नाहीं ॥४॥ तुका म्हणे तरि करिती याची सेवा । देवापाशीं हेवा नाहीं कुडें ॥५॥