भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरले ते मागें आपुलिया सत्ता । कमाई अनंता करूनियां

tarale te magen apuliya satta | kamai ananta karuniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तरले ते मागें आपुलिया सत्ता । कमाई अनंता करूनियां ॥१॥ उसनें फेडितां धर्म तेथें कोण । ते तुज अनन्ये तुह्मी त्यांसी ॥ध्रु.॥ मज ऐसा कोण सांगा वांयां गेला । तो तुह्मी तारिला पांडुरंगा ॥२॥ तुका म्हणे नांमासारिखी करणी । न देखें हें मनीं समजावें ॥३॥