भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरले नामें अनेक तरती । वैकुंठा जाती घोषगजरें

tarale namen anek tarati | vaikuntha jati ghoshagajaren

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तरले नामें अनेक तरती । वैकुंठा जाती घोषगजरें ॥१॥ ऐसा याचा कीर्तिमहिमा । उत्तमा अधमा सारिखाचि ॥२॥ कलियुगीं तो सुगम सार । नामोच्चार हरीचा ॥३॥ निळा म्हणे अनुतापेंसी । गाती वैंकुठासी ते जाती ॥४॥