भजनी मालिका

भजने

तनु हें आकाश चंद्रमा तें मुख । असे निष्कलंक परी-क्षिती ॥१॥ पूर्णिमेचा चंद्र त्याहूनि अधीक । शोभत श्रीमुख कृष्ण-जीचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तप तीर्थ दान व्रत आचरण । गातां हरीगुण वारूं नये ॥१॥ कोटि कुळें त्याचीं वाटुली पाहाती । त्या तया घडती ब्रम्हहत्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तप थोर देखिलें संसारीं । जो अखंड कीर्तन करी । त्याच्या तपा पुढारिले हरि । हें निर्धारें जाणा हो ॥१॥ धन्य धन्य विष्णुदास । ऐसा हरिनामीं सौरस । ते पितरांसहित वैकुंठ । सर्वकाळ क्रमिती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तप न करिसी जप ह्लषिकेशी । नाम अहर्निशीं राघोबाचें ॥१॥ तीर्थाचें हें तीर्थ नाम हें समर्थ । होइल कृतार्थ रामनामीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तपासी तें मन करूं पाहे घात । धरोनि सांगात इंद्रियांचा ॥१॥ म्हणोनि कीर्तन आवडलें मज । सांडोनियां लाज हें चि करी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तपें दानें व्रतेम यज्ञाचिया कोडी । तुकितां जालीं थोकडीं हरिनामें ॥१॥ न पुरे त्यांसी घातलीं त्रिभुवनींची तीर्थे । नयेची पुरतें रामनामेंसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तम भज्याय ते बुरा जिकीर तै करे । सीर काटे ऊर कुटे ताहां सब डरे ॥१॥ ताहां एक तु ही ताहां एक तु ही । ताहां एक तु ही रे बाबा हमें तुम्हें नहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तया घडले सकळ नेम । मुखीं विठोबाचें नाम॥१॥ कांहीं न लगे सिणावें । आणिक वेगळाल्या भावें । वाचे उच्चारावें। रामकृष्णगोविंदा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तयां ठायीं जातां शुध्द होय अमृत । नारदें ही मात सांगितली ॥१॥ तेव्हां एकादशी आली सोमवारीं । विमान पंढरीं उतरलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तयाचिये भेटीं जावें उठाउठीं । कृपाळु जगजेठी उदार तो ॥१॥ पूर्वी उपमन्युसी क्षीरसागर दिधला । अढळपदीं ठेविला बाळ धुरु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तयाची सुंदरा शांतीची बाहुली । आणिक जीभली बोलों नेणे ॥१॥ सेवेसी सादर होऊनियां राहे । भुकची ते खाये भुकेलिया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तयाचें चरित्र तोचि वदवीत । वैकुंठ समर्थ नांदे घरीं ॥१॥ प्रतिष्ठानालागी स्वयें जनार्दन । राहिले कारण दोन मास ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तयाचे मस्तकीं नाचे नारायण । आरंभी गायन जग-दीश ॥१॥ त्रैलोक्याचा भार घाली ह्लषीकेशी । दमीत दुष्टासी स्वामी माझा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव