भजनी मालिका
← भजनांकडे परत

तयाचें चरित्र तोचि वदवीत । वैकुंठ समर्थ नांदे घरीं

tayachen charitra tochi vadavit | vaikunth samartha nande gharin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तयाचें चरित्र तोचि वदवीत । वैकुंठ समर्थ नांदे घरीं ॥१॥ प्रतिष्ठानालागी स्वयें जनार्दन । राहिले कारण दोन मास ॥२॥ नित्यनेम ज्याचा करी प्रात:स्नान । विधियुक्त जाण्‍ वेदमार्गे ॥३॥ निळा म्हणे जातां गोदेचिया स्नाना । नवल विंदाना देखियेलें ॥४॥