भजनी मालिका
← भजनांकडे परत

तयां ठायीं अभिमान नुरे । कोड अंतरीचें पुरे

tayan thayin abhiman nure | kod antarichen pure

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तयां ठायीं अभिमान नुरे । कोड अंतरीचें पुरे ॥१॥ तें हें जाणा पंढरपूर । उभ देव विटेवरी ॥२॥ आलिंगनें काया । होतासे तया ठाया ॥३॥ चंद्रभागे स्नान । तेणें पुर्वजा उद्धरणा ॥४॥ एका जनार्दनीं शरण । पंढरी भूवैकुंठ जाण ॥५॥