भजनी मालिका
← भजनांकडे परत

तपें केलीं दाटोदाटीं । थोर पुण्याचिया साठीं

tapen kelin datodatin | thor punyachiya sathin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तपें केलीं दाटोदाटीं । थोर पुण्याचिया साठीं ॥१॥ जन्मोजन्मींचा संकटीं । विठो तुझी जाली भेटी ॥२॥ दोन्हीं चरण लल्लाटीं । नामा म्हणे न सोडीं मिठी ॥३॥