भजनी मालिका
← भजनांकडे परत

तयाचे मस्तकीं नाचे नारायण । आरंभी गायन जग-दीश

tayache mastakin nache narayan | arambhi gayan jag-dish

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तयाचे मस्तकीं नाचे नारायण । आरंभी गायन जग-दीश ॥१॥ त्रैलोक्याचा भार घाली ह्लषीकेशी । दमीत दुष्टासी स्वामी माझा ॥२॥ होतां एक क्षण झाला तेव्हां क्षीण । जाऊं पाहे आण काळीयाचा ॥३॥ तेव्हां त्याच्या स्त्रीया करिताती स्तुती । लक्षुमीच्या पती कृपाळूवा ॥४॥ यज्ञेशा अच्युता गोविंदा माधवा । दयानिधि केशवा कृष्णनाथा ॥५॥ श्रीधरा वामना अगा वासुदेवा । ऐकावी ही देवा विज्ञापना ॥६॥ आह्मांलागीं आतां देईं चुडेदान । धरिती चरण कृष्णजीचे ॥७॥ दीना़चा दयाळ दासाच्या कैवारी । नामा ह्मणे हरि उतरला ॥८॥