भजनी मालिका
← भजनांकडे परत

तप तीर्थ दान व्रत आचरण । गातां हरीगुण वारूं नये

tap tirtha dan vrat acharan | gatan harigun varun naye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तप तीर्थ दान व्रत आचरण । गातां हरीगुण वारूं नये ॥१॥ कोटि कुळें त्याचीं वाटुली पाहाती । त्या तया घडती ब्रम्हहत्या ॥ध्रु.॥ आपुलिया पापें न सुटे सायासें । कोणा काळें ऐसें निस्तरेल ॥२॥ व्हावें साह्य तया न घलावें भय । फुकासाठी पाहे लाभ घात ॥३॥ तुका म्हणे हित माना या वचना । सुख दुःख जाणा साधे फुका ॥४॥