भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरि म्यां आळवावे कोणा । कोण हे पुरवील वासना। तुजवांचूनि नारायणा । लावी स्तना कृपावंते

tari myan alavave kona | kon he puravil vasana| tujavanchuni narayana | lavi stana krupavante

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तरि म्यां आळवावे कोणा । कोण हे पुरवील वासना। तुजवांचूनि नारायणा । लावी स्तना कृपावंते ॥१॥ आपुला न विचारी सिण । न धरीं अंगसंगें भिन्न । अंगीकारिलें राखें दीन । देई जीवदान आवडीचें ॥ध्रु.॥ माझिये मनासिहे आस । नित्य सेवावा ब्रम्हरस । अखंड चरणींचा वास । पुरवीं आस याचकाची ॥२॥ माझिया संचिताचा ठेवा । तेणें हे वाट दाविली देवा । एवढा आदराचा हेवा । मागें सेवादान आवडीनें ॥३॥ आळवीन करुणावचनीं। आणीक गोड न लगे मनीं । निद्रा जागृती आणि स्वप्नीं । धरिलें ध्यानीं मनीं रूप ॥४॥ आतां भेट न भेटतां आहे । किंवा नाहीं ऐसें विचारूनि पाहें । लागला झरा अखंड आहे । तुका म्हणे साहे केलें अंतरीं ॥५॥