भजनी मालिका

भजने

तवं त्या करिती शंखस्फूरण । दीर्धवरें आक्रदन । तें ऐकांनियां नागरीक जन । हाहाभूत वोरसले ॥१॥ तयांते पुसता त्य म्हणती । दु:खर्णवी पडिलों हो भूपती । सांगता पुतनेची गती । मूच्छित पडती धरणीये ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तंव त्यां म्हणे रे गडिहो ऐका । उतरुनी हाचि आणूं निका । असेल चपळ गडी जो नेटका । तेणें चढावें वृक्षावरी ॥१॥ तंव ते म्हणती नहो बाहेरी । आम्ही बळकट चढावाया वरी । वृक्षही उंच गगनोदरीं । डोहो भ्यासुर अक्षोभ हा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तंव त्या रिठीयासी निघालीं वदनें । अति विक्राळ दाढां दशनें । श्रीकृष्ण्‍ा कंठीचे रुधिरपान । करावया उदितें ॥१॥ कृत्रिमें जाणेनियां ते श्रीहरी । कवळूनि धरिलीं दोहीं करी । आणि घालूनियां मुखाभीतरीं । चावुनी धरणिये टाकिलीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तंव दिव्य रत्नमणि मस्तकीं किरीटी । मळवट लल्लाटीं कस्तुरीचा ॥१॥ माथां मोरपिसावेठीं कुंडलें गोमटीं । पाहात कृपादृष्टी निजभक्ताम ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तंव धांउनी गेला चरणीं लागला । देवा तूं दाखविला ठेवा माझ्या मायबापाचा ॥१॥ जाऊन तो धरीन न सोडीं मी आतां । जे मज पंढरिनाथा ग्वाही दिधली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तंव निजभुवनीं सुखें पंढरीनाथ । नित्य जीवीं आर्त निजहक्तांचे ॥१॥ कृपेचा वारेसु होता देवापोटीं । तेचि करी गोष्ट रुक्माईसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तंव पातला माध्यान्हकाळ । गोवळां भुकेची झाली वेळ । मग पाहोनियां उत्तम स्थळ । सुरुतरु शीतळ छायातळीं ॥१॥ तेथें बैसविल्या पंगती । घोंगडी घालूनियां खलती । कृष्ण म्हणे गाडियांपगती । शिदोया एकत्र कालवूं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तंव पुडलिक पुढारला । कर जोडिनियां वदला । म्हणे वेदादिकां अबोला । तुझिया स्वरूपाचा ॥१॥ तो तूं प्रगट श्रीरंगा । येऊनि आमुच्या लोभा । स्थिर राहूनि चंद्रभागा । भक्तजनां तारीसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तंव पुसती होय माता । तुम्हीं झणें खेद करा चित्ता । तरी ज्ञानासारिखा कां आतां । समाधीसी बैसवितां ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

तंव म्हणती द्विज परियेसी गुणनिधी । प्रतिपादिले वेदीं जे जे धर्म ॥१॥ ते ते आचरावे विहित क्रियाकर्म । जें जें वर्णाश्रमें आलें जया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तंव म्हणती नारदमुनि परियेसी वो माते । सांगेन मी तूतें सत्य मानी ॥१॥ हा निर्विकल्प देव येतसे रुपा । करावया कृपा भक्तजनां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ताकहि पांढरें दूधहि पांढरें । चवी जेवणारे जाणवीते ॥१॥ केळाच्या पाठीवर ठेविला दोडका । तोहि ह्मणे विका तेणें मोलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ताकें कृपण तो जेवूं काय घाली । आहाच ते चालीवरी कळे ॥१॥ काय तुम्हां वेचे घातलें सांकडें । माझे आलें कोडें आजिवरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तातडीची धांव अंगा आणि भाग । खोळंबा तो मग निश्चितांचा ॥१॥ म्हणउनि वरी विचारावी चाली । उरीचि ते बोली कामा येते ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम