भजनी मालिका
← भजनांकडे परत

ताकहि पांढरें दूधहि पांढरें । चवी जेवणारे जाणवीते

takahi pandharen dudhahi pandharen | chavi jevanare janavite

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ताकहि पांढरें दूधहि पांढरें । चवी जेवणारे जाणवीते ॥१॥ केळाच्या पाठीवर ठेविला दोडका । तोहि ह्मणे विका तेणें मोलें ॥२॥ ढोर ह्मणती आह्माम हाकारे लास । वारुवा सरसे खाऊं द्या घांस ॥३॥ मंदल्याजेती घरोघरीं गाती । धृपदासाठीं ताक मागती ॥४॥ नामा म्हणे सोपीं कवित्वें झालीं फुका । हरि हरि म्हणा आपुलिया सुखा ॥५॥