भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव धांउनी गेला चरणीं लागला । देवा तूं दाखविला ठेवा माझ्या मायबापाचा

tanv dhanuni gela charanin lagala | deva tun dakhavila theva majhya mayabapacha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तंव धांउनी गेला चरणीं लागला । देवा तूं दाखविला ठेवा माझ्या मायबापाचा ॥१॥ जाऊन तो धरीन न सोडीं मी आतां । जे मज पंढरिनाथा ग्वाही दिधली ॥२॥ तंव खेचरु तेथें स्नानसंध्या करी । तंव ओढोनी पाय धरी विठा नामयाचा ॥३॥ तंव तो अवचिता खडबडोनी भ्याला । कोठोनी घाला पडिला धाडी मजवरी ॥४॥ उठी परता तूं कोणाचारे काय । ठाईं ठाईं राहें हालूं नको ॥५॥ तुझिया वडिलासी जाब देईन । धरोनी नेईन हें पोर कोणाचें ॥६॥ लाडिकें लडिवाळ आपुलें बा धांवे पायीं । तुज कोणी नाहीं मग तूं निलाजिरे ॥७॥ छंद ना बंद झोबतोसी धीटा । बांधेन चोहटा चौघाचारी ॥८॥ फजीत करतील तुज कीं मज जाण । खेचर विसोबा म्हणती जा तुज विठोबाची आण ॥९॥