भजनी मालिका
← भजनांकडे परत

तातडीची धांव अंगा आणि भाग । खोळंबा तो मग निश्चितांचा

tatadichi dhanv anga ani bhag | kholamba to mag nishchitancha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तातडीची धांव अंगा आणि भाग । खोळंबा तो मग निश्चितांचा ॥१॥ म्हणउनि वरी विचारावी चाली । उरीचि ते बोली कामा येते ॥ध्रु.॥ कोरडें वैराग्य माजिरा बडिवार । उतरे तो शूर अंगींचें तें ॥२॥ तुका म्हणे बरी झऱ्याची ते चाली । सांठवण्या खोली कासयांची ॥३॥