भजनी मालिका

भजने

तांतडीनें आम्हां धीर चि न कळे । पाळावे हे लळे लवलाहीं ॥१॥ नका कांहीं पाहों सावकाशीं देवा । करा एक हेवा तुमचा माझा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तान्हेलिया जाय उदका लागोनी । पारधी देखोनी मुरडे वेगीं ॥१॥ तैसे तुझे चरण विसरलों देवा । संसार केशवा देखोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ताप हें हरण श्रीमुख । हरी भवरोगा ऐसें दुःख । अवलोकितां उपजे सुख । उभें सन्मुख दृष्टीपुढें ॥१॥ न पुरे डोळियांची धणी । सखोल कृपेची च खाणी । स्तवितां न पुरे वेदवाणी । तो हा समचरणी कृपानिधी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तापत्रयअग्निची जळतसे सगडी । आहाळोनि कोरडी जाली काया ॥१॥ केव्हां करुणाघना वोळसी अंबरीं । निवविसी नरहरी कृपादृष्टी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तापत्रयें तापलीया पंढरीसी यावें । दरुशनें मुक्त व्हावें हेळामात्रें ॥१॥ दुःखाची विश्राती सुखाचा आनंद । पाहतां चिदानंद विठ्ठल देव ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तापलिया तापें शिणलीया मार्गीं । पोहे ठाकी वेगीं कृष्णकथा ॥१॥ कृष्णकथा गंगा सांवळें उदक । मना बुडी दे कां वोल्हावसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तापलीया तापत्रयें संतां शरण जावें । जीवेंभावें धरावें चरण त्यांचे ॥१॥ करुनि विनवणी वंदु पायवाणी । घालुं लोटांगणी मस्तक हें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तापल्यावांचून नव्हे अळंकार । पिटूनियां सार उरलें तें ॥१॥ मग कदाकाळीं नव्हे शुद्ध जाति । नासें शत्रु होती मित्र ते चि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तापीचिये तीरीं महत्‌ग्राम थोर । असे सोमेश्वर पुरातन ॥१॥ वद्य वैशाख मास दशमी निर्मळ । उष्णकाळ फार तापतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तांबगी हें नाणें न चले खऱ्या मोलें । जरी हिंडविलें देशोदेशीं ॥१॥ करणीचें कांहीं न मने सज्जना । यावें लागे मना वृद्धांचिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तामसाचीं तपें पापाची सिदोरी । तमोगुणें भरी घातले से ॥१॥ राज्यपदा आड सुखाची संपित्त । उलंघूनि जाती निरयगांवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम