भजनी मालिका
← भजनांकडे परत

तापत्रयें तापलीया पंढरीसी यावें । दरुशनें मुक्त व्हावें हेळामात्रें

tapatrayen tapaliya pandharisi yaven | darushanen mukta vhaven helamatren

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तापत्रयें तापलीया पंढरीसी यावें । दरुशनें मुक्त व्हावें हेळामात्रें ॥१॥ दुःखाची विश्राती सुखाचा आनंद । पाहतां चिदानंद विठ्ठल देव ॥२॥ संसारीं तापलें त्रितापें आहाळले । विश्रांतीये आले पंढरीसी ॥३॥ सर्वांचे माहेर भाविकंचे घर । एका जनार्दनी निर्धान केला असे ॥४॥