भजनी मालिका
← भजनांकडे परत

तापलीया तापत्रयें संतां शरण जावें । जीवेंभावें धरावें चरण त्यांचे

tapaliya tapatrayen santan sharan javen | jivembhaven dharaven charan tyanche

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तापलीया तापत्रयें संतां शरण जावें । जीवेंभावें धरावें चरण त्यांचे ॥१॥ करुनि विनवणी वंदु पायवाणी । घालुं लोटांगणी मस्तक हें ॥२॥ उपासनामार्ग सांगती ते खुण । देती मंत्र निर्वाण विठ्ठल हरि ॥३॥ एका जनार्दनीं संतासी शरण । रात्र आणि दिन चिंतूं त्यासीं ॥४॥