भजनी मालिका
← भजनांकडे परत

तापीचिये तीरीं महत्‌ग्राम थोर । असे सोमेश्वर पुरातन

tapichiye tirin mahat‌gram thor | ase someshvar puratan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तापीचिये तीरीं महत्‌ग्राम थोर । असे सोमेश्वर पुरातन ॥१॥ वद्य वैशाख मास दशमी निर्मळ । उष्णकाळ फार तापतसे ॥२॥ तेथें परशुरामें मारियेला बाण । पाह्ती पुरातन पश्चिमेस ॥३॥ पाहिलें माय आम्हीं तापीतीर । उतरले भार वैष्णवांचे ॥४॥ धन्य तापीतीर दिसे मनोहर । दोही थडी भार पताकांचे ॥५॥ नामा म्हणे हरी आवडीचें स्थळ । कण्हेर कमळ उदय जाला ॥६॥