भजनी मालिका
← भजनांकडे परत

तांतडीनें आम्हां धीर चि न कळे । पाळावे हे लळे लवलाहीं

tantadinen amhan dhir chi na kale | palave he lale lavalahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तांतडीनें आम्हां धीर चि न कळे । पाळावे हे लळे लवलाहीं ॥१॥ नका कांहीं पाहों सावकाशीं देवा । करा एक हेवा तुमचा माझा ॥ध्रु.॥ वोरसाचा हेवा सांभाळावी प्रीत । नाहीं राहों येत अंगीं धंदा ॥२॥ तुका म्हणे मज नका गोवूं खेळा । भोजनाची वेळा राखियेली ॥३॥