भजनी मालिका

भजने

तीर्थाचिये आसे । पंथ तो निदैव । पाविजेतो ठाव अंतराय ॥१॥ म्हणऊनि भलें निश्चळ चि स्थळीं । मनाचिये मुळीं बैसोनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तीर्थाची अपेक्षा स्थळीं वाढे धर्म । जाणावें तें वर्म बहु पुण्य ॥१॥ बहु बरी ऐसी भाविकांची जोडी । काळ नाहीं घडी जात वांयां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तीर्थांचे जे मूळ व्रतांचें फळ । ब्रम्ह तें केवळ पंढरिये ॥१॥ तें आह्मीं देखिलें आपुल्या नयनीं । फिटलीं पारणीं डोळियांचीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तीर्थाटणें एकें तपें हुंबरती । नाथिले धरिती अभिमान ॥१॥ तैसे विष्णुदास नव्हती साबडे । एकाचिया पडे पायां एक ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तीर्थे करोनी नामा पंढरीये आला । जिवलगा भेटला विठोबासी ॥१॥ सद्‌गदित कंठ वोसंडला नयनीं । घातली लोळणी चरणावरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुका म्हणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासीं खेळतां दिवस गमे ॥१॥ दिवस राती कांहीं नाठवे तयांसी । पाहातां मुखासी कृष्णाचिया ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

तुका म्हणे सुख घेतलें गोपाळीं । नाचती कांबळीं करुनि ध्वजा ॥१॥ करूनियां टिरी आपुल्या मांदळ । वाजविती टाळ दगडाचे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

तुकोबाचें कीर्तनमेळीं । नाचे कल्लोळीं स्वानंदें ॥१॥ क्षिरापती वांटी हातें । कालाही सांगातें करुं धांवे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलेचि देसी पद दासा ॥१॥ शुद्ध हीन कांहीं न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देहीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

तुज ऐसें वाटे देह व्यर्थ जावा । द्यूतकर्म खेळावा सारीपाट ॥१॥ मग नाहीं नाम निजल्य जागा राम। जन्मोनि अधम दुःख पावे ॥२॥

रचनाकार: संत सेना

तुज करितां होय ऐसें कांहीं नाहीं । डोंगराची राई रंक राणा ॥१॥ अशुभाचें शुभ करितां तुज कांही । अवघड नाहीं पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुज काय करूं मज एक सार । अमृतसागर नाम तुझें ॥१॥ काय येणें उणें आम्हां तयापोटीं । गोवितां हे कंठीं कामधेनु ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम