भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुकोबाचें कीर्तनमेळीं । नाचे कल्लोळीं स्वानंदें

tukobachen kirtanamelin | nache kallolin svananden

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तुकोबाचें कीर्तनमेळीं । नाचे कल्लोळीं स्वानंदें ॥१॥ क्षिरापती वांटी हातें । कालाही सांगातें करुं धांवे ॥२॥ उदकामाजीं रक्षी वह्या आलिंगी बाह्या पररुनी ॥३॥ निळा म्हणे ऐशा कीर्ति । वाढवी श्रीपती दासांच्या ॥४॥