भजनी मालिका
← भजनांकडे परत

तीर्था जाती उदंड । त्याचें पाठीमागें तोंड

tirtha jati udand | tyachen pathimagen tond

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तीर्था जाती उदंड । त्याचें पाठीमागें तोंड ॥१॥ मन वासना ठेउनी घरीं । तीर्थां नेली भांडखोरी ॥२॥ गंगेंत मारितां बुडी । मन लागलें बिर्‍हाडीं ॥३॥ नमस्कार करितां देवासी । मन पायपोसापाशीं ॥४॥ लवकर करी प्रदक्षिणा । उशीर झालासे भोजना ॥५॥ एका जनार्दनीं स्थिर मन । नाहीं तंव काय साधन ॥६॥