भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज करितां होय ऐसें कांहीं नाहीं । डोंगराची राई रंक राणा

tuj karitan hoy aisen kanhin nahin | dongarachi rai rank rana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुज करितां होय ऐसें कांहीं नाहीं । डोंगराची राई रंक राणा ॥१॥ अशुभाचें शुभ करितां तुज कांही । अवघड नाहीं पांडुरंगा ॥ध्रु.॥ सोळा सहस्त्र नारी ब्रम्हचारी कैसा । निराहारी दुर्वासा नवल नव्हे ॥२॥ पंचभ्रतार द्रौपदी सती । करितां पितृशांती पुण्य धर्मा ॥३॥ दशरथा पातकें ब्रम्हहत्ये ऐसीं । नवल त्याचे कुशीं जन्म तुझा ॥४॥ मुनेश्वरा नाहीं दोष अनुमात्र । भांडवितां सुत्र वध होती ॥५॥ तुका म्हणे माझे दोष ते कायी । सरता तुझा पायीं जालों देवा ॥६॥