भजनी मालिका

भजने

तुज काय देवा न पुरतें आलें । विश्वासें ठेविलें अभिलाषंसी ॥१॥ लाजिरवाणें नको करूं देवा आतां । देईंगा कृपावंता नामप्रेम ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुज गीतीं गातां न येसी पांडुरंगा । प्रेमेंचि दडूं गा पायांपाशीं ॥१॥ वांकडें तिकडें जैसें आलें तैसें । गावया उल्हास उगवला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुज घालोनियां पूजितों संपुष्टीं । परि तुझ्या पोटीं चवदा भुवनें ॥१॥ तुज नाचऊनि दाखवूं कौतुक । परी रूपरेखा नाहीं तुज ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुज चि पासाव जालोंसे निर्माण । असावें तें भिन्न कासयानें ॥१॥ पाहावा जी ठायीं करूनि विचार । न्यून कोठें फार असे चि ना ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुज जाणें तानें नाहीं पांडुरंगा । कां जी मज सांगा उपेक्षिलें ॥१॥ तुज ठावें होतें मी पातकी थोर । आधीं च कां थार दिधली पायीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुज दिलें आतां करीं यत्न याचा । जीवाभाव वाचाकायामन ॥१॥ भागलों दातारा सीण जाला भारी । आतां मज तारीं शरणागता ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुज दिलें आतां यत्न करी याचा । जीवभाव वाचा काया मनें ॥१॥ भागलों दातारा शीण जाला भारी । आतां मज तारी अनाथासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुज न करितां काय नव्हे एक । हे तों सकिळक संतवाणी ॥१॥ घेई माझा भार करीं कइवार । उतरीं हा पार भवसिंधु ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुज पासाव जन्मलों हरी पुढती सामावलों तुझ्या उदरीं । तुझिया व्यापकपणें चाले सत्कर्माची दोरी ।

तुज पाहावें हे धरितों वासना । परि आचरणा ठाव नाहीं ॥१॥ करिसी कैवार आपुलिया सत्ता । तरि च देखता होइन पाय ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुज म्हणतील कृपेचा सागर । तरि कां केला धीर पांडुरंगा ॥१॥ आझुनि कां नये तुज माझी दया । काय देवराया पाहातोसि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुज वर्णी ऐसा तुज विण नाहीं । दुजा कोणी तीहीं त्रिभुवनीं ॥१॥ सहस्रमुखें शेष सिणला बापुडा । चिरलिया धडा जिव्हा त्याच्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम