भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज वर्णी ऐसा तुज विण नाहीं । दुजा कोणी तीहीं त्रिभुवनीं

tuj varni aisa tuj vin nahin | duja koni tihin tribhuvanin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुज वर्णी ऐसा तुज विण नाहीं । दुजा कोणी तीहीं त्रिभुवनीं ॥१॥ सहस्रमुखें शेष सिणला बापुडा । चिरलिया धडा जिव्हा त्याच्या ॥ध्रु.॥ अव्यक्ता अलक्षा अपारा अनंता । निर्गुणा सचिद नारायणा ॥२॥ रूप नाम घेसी आपुल्या स्वइच्छा । होसी भाव तैसा त्याकारणें ॥३॥ तुका म्हणे जरी दाविसी आपणा । तरि च नारायणा कळों येसी ॥४॥