भजनी मालिका

भजने

तुझा विष्णुदास म्हणतात जगीं । नाहीं माझें अंगीं प्रेमभाव ॥१॥ तेणें थोर लाज वाटे पंढरिराया । ये माझ्य ह्रदया एक वेळां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुझा विसर नको माझिया जीवा । क्षण एक केशवा मायबापा ॥१॥ जाओ राहो देह आतां ये चि घडी । कायसी आवडी याची मज ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझा शरणागत झालों मी अंकित । करीं माझे हित पांडुरंगा ॥१॥ पतितपावन तुझी ब्रीदावळी । ते आतां सांभाळीं मायबापा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझाचि अहंकार तुजचि नाडील। मागुता मांडील संसारु हा ॥१॥ सांडी सांडी मोहो विषय टवाळ । वाचेसी गोपाळ उच्चारी रे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुझिया कृपेचें पोसणें मी दीन । करीं तुं जतन जनार्दना ॥१॥ अंकित मी दास कायामनेंवाचा । हेलावा कृपेचा करी देवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तुझिया खेळा बहु भ्याले । नेणों ब्रह्मादिक ठकले ॥१॥ कान्होबा आमुचा तुं गडी । न सोडिसी आपुली खोडी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तुझिया चरणाची न संडी मी आस । मग होत गर्भवास कोटिवरी ॥१॥ हेंचि मज द्यावें जन्मजन्मांतरीं । वाचे नरहरी नाम तुझें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुझिया चरणाचें तुटतां अनुसंधाण । नेलें माझॆं मन षड्‌वर्गीं ॥१॥ धांव गा विठ्ठला सोडवीं आपुला दास । थोर कासावीस केलों बापा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुझिया चरणाचें तुटतां अनुसंधान । जाती माझे प्राण तत्क्षणीं ॥१॥ मग हें ब्रह्मज्ञान कोणापें सांगसी । विचारीं मानसीं केशिराजा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुझिया चरणीं अनुपम्य सुख । हें तो अलोलिक रमा जाणे ॥१॥ जाणती ते भक्त प्रेमळ सज्जन । अभाविक दुर्जन तयां न कळे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तुझिया दासांचा हीन झालों दास । न धरीं उदास मायबापा ॥१॥ तुजविण प्राण कैसा राहों पाहे । वियोग न साहे क्षणभरि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझिया नाम्यानें बळी देउनि चित्त । जन्मोनियां आप्त केलें मज ॥१॥ इष्ट मित्र बंधु जननी जनक । सर्वव मीच एक करूनि ठेला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुझिया पायांचें प्रमाण हेंज माझें । चरण कमळ तुझे विसंबेना ॥१॥ संसाराच्या गोष्टी कीट जाले पोटीं । रामकृष्ण कंठीं माळ घाल ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुझिया पार नाहीं गुणां । माझी अल्प मति नारायणा। भवतारका जी सुजाणा । एक विज्ञापना पायांपाशीं ॥१॥ काय जाणावें म्यां दीनें । तुझिये भक्तीचीं लक्षणें । धड तें तोंड धोऊं नेणें । परि चिंतनें काळ सारीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझिया पुत्रासी लागलेंसे मूळ । करील निर्मूल सर्व-त्रांचें ॥१॥ बाळकाचे अंगीं अवचिन्हें बहूत्त । नेऊनि गर्तेंत टाका यासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव