भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझिया गुणासाठीं लागलों भजनापाठीं

tujhiya gunasathin lagalon bhajanapathin

तुझिया गुणासाठीं लागलों भजनापाठीं । तुझी सगुणगोठी ह्रदयीं वसे ॥ मी म्हणें तें जीवन कीं निर्गुण चैतन्यघन । व्याप्य व्यापक स्थान दुजें नाहीं ॥ विश्वाकारें जगडंबरला जो श्रुति नेति नेति म्हणोनि ठेला । हेंची भावें विचारी भलें ॥ परि दृष्टी सगुण ह्रदयींचि हेचि खुण परी न विसंबे तुझीया पाया रया ॥१॥ तूं एकुची एकला बाहिजु भीतरी । कोणा द्वैतपरी सांगो बापा ॥२॥ म्हणोनि परापर स्थूळसूक्ष्मादि विचार । तो तुझा सगुणची आधार मज वाटे ॥ म्हणोनी ते तुझी बुंथी हेचि उरो आम्हां स्थिती । कीं द्वैताद्वैत भ्रांती न लगे मना ॥३॥ ते तुझेनि सुखें पडिपाडे आणि हें मनची स्वयें उजाळें । तेथें थोडें बहु न निवडे ऐसें जालें ॥ तेथें आपुलेंची अंग विसर पडो ठेलें । शेखी सोंगची दुणावले रया ॥४॥ या मनाची भ्रांती फेडावया तो तुझा सगुणभाव मज गोड लागे । पाहाते पाहाणियामाजि स्वयेंची विस्तारलासी कीं देखणेंची होऊनी अंगें । त्रिपुटीसहित शून्याशून्य निमाले ॐकार मार्गही न चले । रखुमादेविवरु विठ्ठले उदारे । सुख भोगिजे येणें अंगे रया ॥५॥