भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझिया चरणाचें तुटतां अनुसंधाण । नेलें माझॆं मन षड्‌वर्गीं

tujhiya charanachen tutatan anusandhan | nelen majhen man shad‌vargin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझिया चरणाचें तुटतां अनुसंधाण । नेलें माझॆं मन षड्‌वर्गीं ॥१॥ धांव गा विठ्ठला सोडवीं आपुला दास । थोर कासावीस केलों बापा ॥२॥ कर्म कुळाचार क्रोध हा अनिवार । मदें निरंतर भ्रांत केलें ॥३॥ मछरें तुजसी दुरावलें देवा । लोभें केला गोवा गर्भवासी ॥४॥ दंभ रसातळीं जातसे घेऊनि । विश्वचक्षु होउनि पाहसी कैसा ॥५॥ नामा म्हणे मज तुझाचि भरंवसा । अनाथा कुंवसा होसी देवा ॥६॥