भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझिया खेळा बहु भ्याले । नेणों ब्रह्मादिक ठकले

tujhiya khela bahu bhyale | nenon brahmadik thakale

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुझिया खेळा बहु भ्याले । नेणों ब्रह्मादिक ठकले ॥१॥ कान्होबा आमुचा तुं गडी । न सोडिसी आपुली खोडी ॥२॥ चोरी करितां गौळणी बांधिती । तुझी न कळे वेदशास्त्रं गती ॥३॥ एका जनार्दनीं शरण । आम्हीं न सोंडुं तुझे चरण रे कान्होबा ॥४॥