भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझिया पुत्रासी लागलेंसे मूळ । करील निर्मूल सर्व-त्रांचें

tujhiya putrasi lagalense mul | karil nirmul sarva-tranchen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझिया पुत्रासी लागलेंसे मूळ । करील निर्मूल सर्व-त्रांचें ॥१॥ बाळकाचे अंगीं अवचिन्हें बहूत्त । नेऊनि गर्तेंत टाका यासी ॥२॥ लोभ धरूनियां ठेवाल बाळाशी । ग्रासील सर्वांसी एक-दांची ॥३॥ ऐकोनी यशोदा गहिवरोनी बोले । गर्गानीं कथिरेले उत्तम गुण ॥४॥ अमंगळ वाणी पुनरपि बोलिला । गर्ग तो चुकला गणितासी ॥५॥ स्तनपान करीत असतां श्रीकृष्ण । मांडिलें विंदान नामा ह्मणे ॥६॥