भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझिया चरणीं अनुपम्य सुख । हें तो अलोलिक रमा जाणे

tujhiya charanin anupamya sukh | hen to alolik rama jane

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुझिया चरणीं अनुपम्य सुख । हें तो अलोलिक रमा जाणे ॥१॥ जाणती ते भक्त प्रेमळ सज्जन । अभाविक दुर्जन तयां न कळे ॥२॥ भक्तियुक्त ज्ञान तेथें घडे भजन । वायां मग शीण जाणीवेचा ॥३॥ एका जनार्दनीं वाउगे ते बोल । भक्तीविण फोल नावडती ॥४॥