भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज म्हणतील कृपेचा सागर । तरि कां केला धीर पांडुरंगा

tuj mhanatil krupecha sagar | tari kan kela dhir panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुज म्हणतील कृपेचा सागर । तरि कां केला धीर पांडुरंगा ॥१॥ आझुनि कां नये तुज माझी दया । काय देवराया पाहातोसि ॥ध्रु.॥ आळवितों जैसें पाडस कुरंगिणी । पीडिलिया वनीं तानभूक ॥२॥ प्रेमरसपान्हा पाजीं माझे आई । धांवें वो विठाई वोरसोनि ॥३॥ तुका म्हणे माझें कोण हरील दुःख । तुजविण एक पांडुरंगा ॥४॥